बीव्हीजी ॲग्रो मॅजिक एक जैविक उत्पादन आहे जे पिकांच्या उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता सुधारते, तसेच पिकांना मातीतील पाणी व पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे ग्रहण करण्यास मदत करते.
बीव्हीजी ॲग्रो मॅजिक / BVG Agrow Magic
बीव्हीजी ॲग्रो मॅजिक
वैशिष्ट्ये
१) ॲग्रो मॅजिकच्या निर्मितीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
२) पिकांची वाढ जलद गतीने होते.
३) पिके लवकर परीपक्व होतात.
४) पिकांची खत व पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते.
५) पिकांची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढते.
६) पिकांमधील शर्करेचे (ब्रिक्स) प्रमाण वाढते.
७) हवामान बदल झाल्यास पिकांची प्रतिकारशक्ती वाढते.फायदे
१) पिकांची जमिनीतील पाणी व अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर पिकांची हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशातून ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
२) पिकांचा प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो. त्यामुळे पानातील हरितद्रव्ये वाढतात. परिणामी पिके सशक्त होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
३) पिकांमध्ये फुलांची संख्या वाढून अधिक फळधारणा होते. त्याचबरोबर फळांचा एकसमान आकार व वजन वाढते. विशेष म्हणजे पिकाची टिकाव क्षमता व गुणवत्ता वाढते.
४) शेतमाल निर्यात खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.वापरण्याची पद्धत व प्रमाण
१) फवारणीसाठी: बीव्हीजी ॲग्रो मॅजिक २ मि.ली. प्रती १ लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
२) आळवणीसाठी: बीव्हीजी ॲग्रो मॅजिक ४०० मि.ली. प्रती १ एकर या प्रमाणात वापरावे.
३) फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५.५ पर्यंत नियंत्रित करून घ्यावा.
४) सकाळी १० च्या पूर्वी आणि सायंकाळी ४.३० वाजल्यानंतर फवारणी अथवा आळवणी करावी. कडक उन्हात फवारणी करू नये.