पिकांना पालाशचा पुरवठा करणारे सेंद्रिय खत
बीव्हीजी पोटॅश / BVG Potash
पोटॅशचे पिकांवरील फायदे आणि वैशिष्ट्ये:
पोटॅश पिकांच्या गुणवत्तेवर मोठा प्रभाव टाकतो. शेतमालाचा टवटवीतपणा, चव, रंग, आणि टिकाऊपणा या सर्व गोष्टी पोटॅशच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. पोटॅशच्या योग्य पुरवठ्यामुळे पिकांना ताण सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. शेतमाल निर्यात प्रक्रियेत पोटॅश महत्त्वाची भूमिका बजावतो, परंतु हे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत नाही. बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार दर्जेदार पोटॅश निर्मिती केली आहे.
दुष्काळी स्थितीत पिकांचे वजन वाढवण्यासाठी पोटॅश: पेशी आवरणाची स्थिरता, मुळांची वाढ, पानांचा आकार, आणि पिकाचे एकूण वजन दुष्काळी परिस्थितीत वाढवण्यासाठी पोटॅश आवश्यक आहे. त्याचा परिणाम पाणी शोषून घेणे आणि पिकाला टिकवून ठेवणे यावर होतो.
वैशिष्ट्ये:
- सर्व प्रकारच्या पिकांमध्ये पोटॅशची उपलब्धता मुख्यतः आयर्नच्या देवाण-घेवाणीतून होते. पिकांनी उचललेला पोटॅश चयापचय क्रियांचे नियंत्रण करतो.
- प्रकाशसंश्लेषण क्रियेत पोटॅशचा महत्त्वाचा सहभाग असतो. अपुऱ्या पोटॅशमुळे श्वसनाची गती वाढते आणि प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते, ज्यामुळे पिकाच्या विविध भागांमध्ये कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा कमी होतो.
- पोटॅशच्या कमतरतेमुळे पानांच्या शेंड्यावर तपकिरी रंगाचे टिपके तयार होतात आणि पानांच्या कडा करपून आकुंचन पावतात.
फायदे:
- फळे, भाजीपाला, आणि अन्नधान्याचे आकार आणि वजन वाढवण्यास मदत होते.
- पेशींमधील विविध आयन्सचे संतुलन राखले जाते.
- लोहासारख्या जड धातूचे चलन-वलन व्यवस्थित होऊ लागते.
- पिकांमध्ये प्रथिनांचे निर्माण होण्यासाठी पोटॅश मदत करते.
- पिस्टमय पदार्थांच्या घडणीसह विघटनाची क्रियाही मार्गी लागते, ज्यातून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ऊर्जा मुक्त होते.
- पीक फुलावर येण्यासाठी आणि फळधारणेसाठी आवश्यक विकरे आणि जैवरसायने तयार होण्यासाठी पोटॅश अत्यावश्यक आहे.
- पिकांच्या चयापचय क्रियांचे सुनियंत्रण होते.
- पिकातील साखर वाढते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते.
- रोगांचा प्रादुर्भाव, कमी पाणी, आणि तापमानातील बदल यामुळे पिकांवर येणाऱ्या ताणाला तोंड देण्यासाठी पोटॅश आणि सिलि कॉन एकत्र काम करतात.
बीव्हीजी पोटॅश पिकांच्या गुणवत्तेची वृद्धी करत, शेतकऱ्यांना सर्वोत्तम उत्पादन मिळवण्यास मदत करते.
Note : For fertilizer category products i.e BVG Prom Pw., BVG Prom Gr., BVG Potash & BVG Silicon, minimum order required is 12 MT with one delivery point. Please call 7720937720 to know more.