top of page

बीव्हीजी ॲग्रो सेफ एक पूर्णतः केमिकल-विरहित उत्पादन आहे, जे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी आहे आणि मधमाश्या आणि भुंग्यांसारख्या मित्रकीटकांना आकर्षित करून शेतमालाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करते.

बीव्हीजी ॲग्रो सेफ / BVG Agro Safe

मूल्य₹450.95 से
मात्रा
  • वैशिष्ट्ये ►

    • ॲग्रो सेफच्या निर्मितीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
    • फवारणी केल्यानंतर कीडांच्या त्वचेवर आघात करून कीडांची श्वसनक्रिया थांबवली जाते, ज्यामुळे कीड मरतात.
    • बुरशींची कायटीन संरचना तोडून बुरशींपासून पिकांचे संरक्षण केले जाते.
    • फवारणी करताना कोणत्याही प्रकारची विषारी वाफ येत नाही.
    • फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला आग होत नाही, त्यामुळे फवारणीसाठी विशिष्ट कपडे, मास्क, व हातमोजे वापरण्याची गरज नाही.
    • कंट्रोल युनियन नावाच्या जागतिक दर्जाच्या संस्थेने ॲग्रो सेफला सेंद्रिय पीक संरक्षक म्हणून प्रमाणित केले आहे.
    • ॲग्रो सेफचे पूर्णतः जैविक विघटन होते.

    फायदे ►

    • पिकांवर येणाऱ्या विविध शत्रू किडींचे प्रभावी नियंत्रण होते.
    • मित्रकीड पिकांकडे आकर्षित होतात.
    • वातावरणाचे प्रदूषण थांबते.
    • निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन मिळवता येते.

    वापरण्याची पद्धत व प्रमाण ►

    • फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू 5.5 पर्यंत नियंत्रित करून घ्यावा.
    • पानाच्या दोन्ही बाजू सुकवतील असे फवारणी करावी.
    • सकाळी 10 च्या पूर्वी आणि सायंकाळी 4.30 वाजल्यानंतर फवारणी करावी.
    • फवारणीसाठी बीव्हीजी ॲग्रो सेफ 3 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात वापर करावा.
    • बियाणेप्रक्रिया आणि रोपे बुडवण्यासाठी बीव्हीजी ॲग्रो सेफ 2 मि.ली. प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
bottom of page