top of page

बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री एक जैविक उत्पादन आहे, ज्यामध्ये वनस्पती जैव उत्तेजक (Bio Stimulant) घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये, १८ प्रकारचे ॲमिनो ॲसिड आणि आवश्यक एन्झाईम्स समाविष्ट आहेत, जे पिकांच्या प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढवून उत्पादनात वाढ घडवून आणतात.

बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री/ BVG Agro Nutri

₹275.92मूल्य
मात्रा
  • वैशिष्ट्ये:

    • बीव्हीजी ॲग्रो न्यूट्रीच्या निर्मितीसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो, आणि हे पर्यावरण पूरक औषध आहे.
    • फवारणी केल्यानंतर काही तासांच्या आत पिके ॲग्रो न्यूट्री शोषून घेण्यास सुरवात करतात.
    • फुले गळून पडण्याचे प्रमाण कमी होते आणि फळांची परिपक्वता वाढते.
    • पिकांचा आकार, गुणवत्ता, रंग आणि साठवण क्षमता वाढते.

    फायदे:

    • पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.
    • पिकांना एकूण १८ प्रकारचे ॲमिनो ॲसिड पुरवली जातात.
    • पिकांच्या शाखीय वाढीच्या अवस्थेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होत असल्याने पिकाची जोमदार वाढ होते.
    • पिकाच्या अनुवांशिक क्षमतेनुसार (Genetic Potential) उत्पादन मिळते.
    • पाने, खोड व मुळांद्वारे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो, ज्यामुळे पिकांची दर्जेदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळते.
    • हवामान बदल व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अभावामुळे पिकाला ताण येतो. ॲग्रो न्यूट्रीच्या वापरामुळे पिकाचे ताणापासून संरक्षण होते.

    वापरण्याची पद्धत व प्रमाण:

    • फवारणी, आळवणी व ठिबकद्वारे वापरता येते.
    • बीव्हीजी ॲग्रो न्यूट्रीचा वापर बीव्हीजी ॲग्रो मॅजिक सोबत केल्यास प्रभावी परिणाम दिसतात.
    • ॲग्रो न्यूट्रीची फवारणी करताना पीक पूर्णपणे ओले झाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
    • फवारणी व आळवणीसाठी बीव्हीजी ॲग्रो न्यूट्री १ ग्रॅम प्रती १ लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
    • ठिबकसाठी २०० ग्रॅम प्रती १ एकर या प्रमाणात वापरावे.
bottom of page