top of page

सिलिकॉनचा पुरवठा करणारे सेंद्रिय खत

बीव्हीजी सिलिकॉन / BVG Silicon

₹843.32मूल्य
मात्रा
  • सिलि कॉनचे पिकांना होणारे फायदे:

    सिलि कॉन वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ आणि टणक थर तयार करते, ज्यामुळे रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच, सिलि कॉन अन्नद्रव्यांचा योग्य वापर करण्यास मदत करते आणि अति नत्र, मॅंगनीज, फेरस यासारख्या अन्नद्रव्यांच्या अयोग्य वापरामुळे होणारे दुष्परिणाम कमी करते. योग्य प्रमाणात सिलि कॉनचा पुरवठा केल्यास, पिकांना दुष्काळी परिस्थितीतही तग धरण्याची क्षमता मिळते.

    सिलि कॉन वनस्पती कशाप्रकारे घेतात? वनस्पती सिलि कॉन फक्त मोनोसिलिसिक ऍसिड किंवा ऑर्थो सिलिसिक ऍसिड (Si(OH)₄) या स्वरूपात शोषून घेतात. हे मुख्यतः मुळांद्वारे पाण्याबरोबर शोषले जाते, आणि झाडांच्या शेंड्याकडे साठवले जाते. सिलि कॉन पानांच्या वरच्या थरात (epidermal cells) साठवले जाते, ज्यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि विकृतीपासून संरक्षण होते.

    सिलि कॉनचे फायदे:

    • पिकांची टणकता वाढवते आणि लोळत नाहीत.
    • पांढऱ्या मुळीच्या निर्मितीला चालना मिळते.
    • फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाते.
    • फळाची प्रत सुधारते आणि टिकाव वाढवते.
    • सिलि कॉनमुळे फळांना चकाकी येते.
    • झाडांमधील जस्त आणि फुलांच्या कार्यक्षम वापरास मदत होते.
    • उस पिकातील रोगांचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
    • भात पिकात आर्सेनिकचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
    • गहू आणि वांगी मध्ये सिलि कॉन वापरल्याने कीड आणि रोग नियंत्रित होतात आणि वांगीचा तजेलदारपणा वाढतो.
  • Note : For fertilizer category products i.e BVG Prom Pw., BVG Prom Gr., BVG Potash & BVG Silicon, minimum order required is 12 MT with one delivery point. Please call 7720937720 to know more.

bottom of page