top of page

बीव्हीजी कॅलबुस्ट प्लस पिकांना बोरॉन आणि कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा करून प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढवतो, सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा करतो आणि वातावरणीय बदलांमध्ये पिकांना तजेलदार ठेवण्यास मदत करतो.

बीव्हीजी कॅलबुस्ट + / BVG Calboost+

मूल्य₹522.41 से
मात्रा
  • बीव्हीजी कॅलबुस्ट प्लस
    वैशिष्ट्ये

    • पिकांच्या सुदृढ वाढीसाठी बोरॉन मदतगार ठरते.
    • पिकाच्या चयापचय क्रियेसाठी अत्यावश्यक असलेले कॅल्शियम आणि नायट्रोजन यांचे योग्य प्रमाणात संतुलन बोरॉनद्वारे केले जाते.
    • पिकाच्या पेशीभित्तिका मजबूत होतात, त्यामुळे पिकांच्या अवयवामध्ये ताकद आणि रोगप्रतिकारक निर्मिती होते.
    • फळांचा गोडवा वाढवणारी शर्करा बीव्हीजी कॅलबुस्ट प्लसद्वारे मिळते.

    फायदे

    • फुलनिर्मिती, परागीभवन, फलधारणा आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी बोरॉन महत्त्वाची भूमिका बजावते.
    • नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या योग्य कार्यक्षमतेसाठी बोरॉनची आवश्यकता असते.
    • फुले, फळे अकाली गळून पडणे, पिकांची वाढ खुंटणे, परागीभवनात अडथळे निर्माण होणे, आणि फळे व बियांची संख्या कमी होणे यासारख्या समस्यांचा निवारण बीव्हीजी कॅलबुस्टद्वारे होतो.
    • पिकांना अत्यावश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड मिळतो.
    • पिकांची खनिज पोषक पदार्थांची उपलब्धता वाढते.
    • पिकांचा प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढतो.
    • नैसर्गिक खनिजांचे सूक्ष्मीकरण होते.
    • बोरॉनमुळे पानांच्या आतील प्रकाशसंश्लेषणात लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढते.

    वापरण्याची पद्धत आणि प्रमाण
    बीव्हीजी कॅलबुस्ट प्लस पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वापरता येते:

    • पिकाच्या वाढीची अवस्था
    • फुलं धारण अवस्था
    • पळाची परिपक्क होण्याची अवस्था

    वापरण्याचे प्रमाण:
    2 ते 2.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी

bottom of page