top of page
Strip SSS.jpeg

BVG चे संस्थापक आदरणीय श्री हणमंतराव गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेनुसार BVG च्या सर्व सहकारी-कर्मचाऱ्यांना BVG च्या उपकंपन्या व त्यांची विविध उत्पादने तथा सेवा याविषयी अधिक माहिती व्हावी, व या वस्तू - सेवा विक्रीतून सहकाऱ्यांना आर्थिक लाभ होऊन त्यांची आर्थिक स्थिती आणखी सुधारावी या हेतूने "संपन्न व समृध्द सहकारी उपक्रमाची" सुरुवात करण्यात आली आहे. ​​

BVG च्या सर्व सहकारी - कर्मचारी मित्रांना विनंती की आपण खालील सर्व व्हिडीओस पाहून मगच कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास आभारी राहू. 

रोज एक एक व्हिडीओ पाहा, त्यावर आपल्याला असलेल्या शंका - सूचना लिहून ठेवा व त्या आपल्या कार्यक्रमात सुचवा, विचारा.​

उपक्रमाचा हेतू, दिशा व अपेक्षित कार्य 

BVG च्या ग्रुप कंपन्यांमध्ये असलेल्या व्यवसाय संधी, बाहेरच्या व्यक्तींना मिळण्याच्या आधी, आपल्या सहकारी-कर्मचाऱ्यांना मिळाव्यात अशी भावना व्यक्त करताना आदरणीय श्री हणमंतराव गायकवाड साहेब

बीव्हीजी लाइफ सायन्सेस औषधे

BVG लाइफ सायन्सेस च्या विविध हर्बल औषधांविषयी अधिक जाणून घ्या, डॉ अर्चना शिंदे यांच्याकडून...

बीव्हीजी कृषी व पशू विभाग

बीव्हीजी अग्रोटेक च्या विविध सेंद्रिय कृषी निविष्ठा व पशू औषधांविषयी अधिक जाणून घ्या, श्री अरुण बारगूजे यांच्याकडून ... 

सातारा मेगा फूड पार्क - अन्न उत्पादने

सातारा मेगा फूड पार्क  च्या विविध उत्पादनांविषयी अधिक जाणून घ्या, श्री विजयकुमार चोले यांच्याकडून ... 

​अप्रेंटिसशीप योजनांद्वारे फायदा 

अप्रेंटिसशिप योजनांद्वारे आपल्या सहकाऱ्यांना दरमहा नियमित उत्पन्न कसे मिळवता येईल हे जाणून घ्या, श्री प्रमोद पवार यांच्याकडून... 

विक्रीची SPANCO पद्धती

SPANCO पद्धतीचा वापर करुन उत्पादने ग्राहकांपर्यंत कशी पोचवावी या विषयी जाणून घ्या श्री अक्षय सरोदे यांच्याकडून... 

उपक्रमात कौटुंबिक सहभाग

बीव्हीजी च्या उपक्रमात आपण आपले मित्र,नातेवाईक कसे जोडू शकता याविषयी जाणून घ्या, सौ वैशालीताई गायकवाड यांच्याकडून

​सर्व सहकाऱ्यांचा उपक्रमात सहभाग 

या उपक्रमात सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन करताना श्री विकास भोसले ...

​प्रत्येक जण निश्चित सहभागी होईल 

सर्वांनी बीव्हीजी ची उत्पादने विक्री करुन आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन करताना श्री सुहास माने ...

सर्वांचे आर्थिक भले करणारा उपक्रम

रूटिन कामासोबतच हे नाविन्यपूर्ण काम करुन आपण अर्थार्जन करावे असे मनोगत श्री निलेश भोसले यांनी व्यक्त केले.

पगारवाढ मागण्यापेक्षा उत्तम पर्याय

फक्त पगार वाढीवर अवलंबून न राहता या उपक्रमातून आपण सक्षम होऊ शकता, असे प्रतिपादन श्री गणेश जाधव यांनी केले ...

​स्टाफ ऑनबोर्डिंग व ऑप्टिक्स App वापरण्याविषयी महत्त्वाचे प्रशिक्षण 

कर्मचारी ऑनबोर्डिंग विषयी माहिती 

साइटवर कर्मचारी ऑनबोर्डिंग करताना सुपरवायझर - मॅनेजर ने काय काळजी घ्यावी या विषयीचे प्रशिक्षण श्री अजित साळुंखे यांनी दिले. 

ऑप्टिक App विषयी माहिती 

कर्मचाऱ्यांची हजेरी ऑप्टिक app द्वारे कशी घ्यावी याचे प्रशिक्षण श्री विक्रम ताथवडे यांनी दिले. 

bottom of page